Home > Entertainment > एकाच दिवसात ऑरी Bigg Boss 17 च्या घराबाहेर

एकाच दिवसात ऑरी Bigg Boss 17 च्या घराबाहेर

एकाच दिवसात ऑरी Bigg Boss 17 च्या घराबाहेर
X

लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ हा नेहमीच र्चचेत असतो. या वेळी बिग बॉस १७ या सिजनमध्ये शनिवारी सेलिब्रिटींचा लाडका ओरहान(ऑरी) याची वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली होती. बॉलिवूडचे स्टारकिड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, न्यासा देवगण यांच्यासोबत दरवेळी पार्ट्यांमध्ये एक चेहरा पहायला मिळतो. हा चेहरा म्हणजे ओरहान अवत्रमणी. ओरहान अवत्रमणी बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सर्व सामान घेऊन तिथे पोहोचला होता. ऑरी यानी सोशल मीडियावर मोठा प्रेक्षकवर्ग आहे.

ऑरी यानी सलमान खानशी संवाद साधताना सांगितल की मी सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्याचे २०-३० लाख रूपये घेतो. बिग बॉसमध्येही तो बरंच सामान घेऊन पोहोचला होता. परंतु लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी ऑरी घरातून बाहेर पडला. फक्त एका दिवसात त्याने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. ऑरी हा वाइल्ड कार्ड एण्ट्री म्हणून घरात प्रवेश करणार असल्याचं सुरुवातीला सांगितलं गेलं होतं. पण तो फक्त वीकेंडला घरातील स्पर्धकांचं मनोरंजन करण्यासाठी पोहोचला होता. हे ऐकून सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Updated : 27 Nov 2023 4:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top