Home > Culture > Gudhipadva | गुढीपाडवा का आणि कधी साजरा करतात ?

Gudhipadva | गुढीपाडवा का आणि कधी साजरा करतात ?

Gudhipadva | गुढीपाडवा का आणि कधी साजरा करतात ?
X

गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा पर्यावरणाचा विचार आहे. महाराष्ट्राच्या नववर्षांची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. या वर्षी ९ एप्रिल २०२४ ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपारिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारून , गोडाधोडाचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी मोठ मोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभयात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.

गुढीपाडव्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे -

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. असं सांगितलं जातं की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजा इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पूजन केले जाऊ लागले. तर इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.

एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतियेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते.

गुढीपाडव्याच महाराष्ट्राच्या संस्कृतीतील अनन्यसाधारण महत्व -

गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. अल्लादायक वसंत ऋतू नंतरचा उन्हाळा बाधू नये म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच कडुलिंबाची पाने खावीत असे सांगितले जाते. सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात म्हणून चैत्रशुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी गुढी उभारून नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्या काठीला वस्त्र बांधून त्यावर कळस ठेवला जातो कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून गुढी सजवले जाते आणि घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे,मांगल्याचे, उत्साहाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो.


Updated : 9 April 2024 4:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top