Home > Business > Tata समुह देणार Reliance ला टक्कर...

Tata समुह देणार Reliance ला टक्कर...

एकीकडे जागतिक मंदी सुरु असताना देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेला टाटा समूह विक्रमाकडे वाटचाल करत आहे. टाटा समूह आगामी ५ वर्षात ९० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

Tata समुह देणार Reliance ला टक्कर...
X

जगभरात सध्या मंदीचे सावट असताना देशात टाटा समुह मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे अदानी (Adani) दिवसेंदिवस डब्यात चालल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी आर्थिक वर्षात टाटा (TATA) समूहाच्या लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यामध्ये २० टक्क्यांच्या दाराने वाढ होत आहे. टाटा समूहाने आपल्या जुन्या आणि नवीन व्यवसायात आगामी पाच वर्षात ९० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे संकेत दिले आहेत. टाटा आपल्या नविन व्यवसायामध्ये ईव्ही, बॅटरी, रिन्युएबल, ५ जी, प्रिसिजन इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर यांचा समावेश करणार आहे. टाटा स्टिल आणि टाटा मोटर्सचे (Tata Motors) मार्केट कॅप समूहाच्या आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (Tata Consutancy Services) बरोबरीने पोहचेल, असा दावा टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekaran) यांनी सांगितले आहे. यामुळे पुढील काळात रिलासन्स कंपनीची टाटा समूहासोबत स्पर्धा होण्याची शक्यता आहे.


सध्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स ही १,५८०,७००.१६ लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर दुसरीकडे टाटा समूहावर अनेकदा टीसीएस या आयटी कंपनीवर अवलंबून असल्याची टीका केली जात असल्याचे टाटा समुहाचे चंद्रशेखरन यांनी सांगितले. मात्र, हे चित्र लवकरच बदलणार असल्याचे सुद्धा चंद्रशेखरन यांनी सांगितले. टीसीएसचे मार्केट कॅप हे १२.९४ लाख कोटी रुपये आहे आणि रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीज नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. टाटा स्टीलचे मार्केट कॅप १.३२ लाख कोटी रुपये आहे. आणि टाटा मोटर्सचे मार्केट कॅप १.६० लाख कोटी रुपये आहे. या दोन्ही कंपन्यांचा महसूल टीसीएसपेक्षा जास्त असला तरी, टाटा मोटर्सचा महसूल ३.०१ लाख कोटी रुपये, टाटा स्टीलचा महसूल २.४५ लाख कोटी रुपये आणि टीसीएसचा महसूल १.९६ लाख कोटी रुपये आहे.


टाटाच्या सर्व समुह कंपन्या मोठ्याप्रमाणात वाढ नोंदवत आहेत. आणि २०२२-२३ मध्ये त्यांची वार्षिक वाढ सुमारे २० टक्के असेल, असा अंदाज असल्याचे चंद्रशेखरन ( Chandrasekaran) यांनी व्यक्त केला आहे. टाटा सारख्या मोठ्या समूहासाठी हे काम खूप चांगले असणार आहे. टाटा समूहाचा एकत्रित नफा आणि रोख प्रवाह खूप मजबूत असल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे. टाटा समुहाची आगामी ५ वर्षात ९० अब्ज डॉलरची गुंतवणुक योजना आहे. टाटाच्या विविध कंपन्या टाटा पॉवर आणि टाटा स्टीलमध्ये प्रत्येकी १० अब्ज डॉलर्सची गुंतवणुक करत आहेत. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स (Tata Motors) आणि जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) पुढील पाच वर्षात २५ अब्ज डॉलरची गुंतवणुक करणार असल्याचा विश्वास चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला आहे. टाटा समुहाच्या सर्व विमान कंपन्या एअर एशिया (Air Asia), विस्तारा (vistara), एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) आणि एअर इंडियाचे (Air India) विलीनीकरण मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा चंद्रशेखरन यांनी व्यक्त केली आहे. टाटा समुह एअर इंडियाला वळण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नवीन व्यवसायातही गुंतवणुक केली जाईल, असेही चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे. ब्रिटनमधील तोट्यात चाललेल्या स्टील युनिटचे भवितव्य येत्या काही दिवसात ठरवले जाणार आहे. तसेच ईव्ही, बॅटरीज, रिन्युएबल, 5G, प्रेसिजन इल्क्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपनीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातून टाटा सन्स मोठ्याप्रमाणात गुंतवणुक करणार आहेत.

Updated : 13 Feb 2023 8:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top