उद्योजक व्हायचंय! बाबासाहेबांचे आर्थिक विचार वाचा: उद्योगपती मिलिंद कांबळे (DICCI)
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने अनेक लोकांनी प्रेरीत होऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्ताने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मिलिंद कांबळे यांच्याशी आम्ही बातचीत केली. ते म्हणाले माझ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा प्रभाव आहे. या विचारांनेच मी स्वतः व्यवसायात उभं राहिलो. बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे कसे निर्माण होतील. हा विचार करुन मी माझा व्यवसाय सुरु केला. आज त्याला 30 वर्ष पूर्ण झाले आहेत.
सध्याचा काळ पाहता अधिका-धिक तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात यायला हवं. म्हणून 'दलित इंडियन कॉमर्स ऑफ चेंबर्स इंडस्ट्री'च्या माध्यमातून देशातील तरुणांना मदत आणि मार्गदर्शन करत आहे.
त्याचबरोबर आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकार सोबत मिळून एक संपूर्ण पॉलिसी सर्पोट तयार केलेला आहे. हे सगळं डॉ. बाबासाहेब यांच्या विचारातून समाजाचं Economic Empowerment झालं पाहिजे या हेतूने आम्ही प्रेरित होऊन काम करत आहोत. असं डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे.