जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या प्रमुख पदावर ‘भारतीय’
जगातील सर्वात मोठ्या कंपनी असलेल्या गुगल, यू-ट्यूब, स्टारबक्स, इत्यादी कपंन्यांच्या मुख्य पदावर भारतीय लोक बसल्याचे पाहायला मिळत आहे. आज हे भारतीय लोक जगामध्ये भारताचे नाव मोठे करताना दिसून येत आहेत.
X
जगभरातील विविध मोठ्या कंपनींच्या प्रमुख पदावर भारतीय बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीयांचा जगभरात डंका वाजतोय. यु-ट्यूब (YouTube) या गुगुलच्या (Google) व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या सीईओपदावर भारतीय वंशाचे नील मोहन (Neil Mohan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट या कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई हे देखील भारतीय वंशाचे आहेत. केवळ याच नव्हे तर अनेक कंपन्यांच्या सीईओपदावर भारतीयांची वर्णी लागली आहे. गेल्या काही वर्षामध्ये हे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. सुंदर पिचाई यांनी २००४ साली गुगलमध्ये प्रवेश केला. २०१५ मध्ये गुगल हा अल्फाबेट (Alphabet) कंपनीचा भाग झाला. आणि पिटाई हे अल्फाबेटचे सीईओ झाले. तर दुसरीकडे सत्या नाडेला जगातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉप्टच्या (Microsoft) सीईओपदावर विराजमान आहेत. ते २०१४ पासून ते या पदावर कार्यरत आहे.
लक्ष्मण नरसिंहन (Laxman Narasimhan) कॉफी चेन कंपनी स्टारबक्सच्या सीईओपदावर यांची नियुक्ती घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी ही तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. अरविंद कृष्णा (Arvind Krishna) हे आयटी कंपनी आयबीएमचे (IBM) सीईओ आहेत. २०२० पासून ते या पदावर आहेत. २०२१ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले. शंतनू नारायण (Shantanu Narayan) सॉफ्टवेअर कंपनी अँडोबचे अध्यक्ष आणि सीईओ हे आहेत. ते २००७ पासून यापदासह कंपनीचे अध्यक्षदेखील आहेत. अजयपाल बंगा गे जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते २०१० ते २०२० या कालावधीत मास्टरकार्डचे सीईओ होते. अशा जगातील विविध कंपन्याच्या प्रमुख पदावर भारतीय विराजमान आहेत.