मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियातील महिलेने अर्थात वैशाली येडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैशाली यांनी भाषण करताना नवरा गेल्यानंतर एका बाईचा प्रवास काय असतो हे आपल्या भाषणातून मांडले आहे. या समाजाला आत्महत्या केलेला शेतकरी दिसतो मात्र त्याच्या पश्चात असलेली बायकोचा खडतर प्रवास नाही दिसत. इथे बोलणारी बाई नाही तर डोलणारी आणि डौलवणाराी बाई पाहिजे. मी विधवा नाही , आम्ही विधवा नाही आम्ही तर एकल महिला आहोत. हा समाज विधवा झाला आहे. तसेच एकटी बाई सर्वांना संधी सारखी वाटते अशा शब्दात वैशाली येडे यांनी भाषण केले.
पाहा हा व्हिडिओ काय म्हणाल्या वैशाली येडे
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2260128640931222/