उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. पंचम यांना मराठी समजत नसल्याने त्यांनी नगरसेवकांना सिंधीत बोलण्याच्या सुचना दिल्या आहे. पंचम कलानी यांनी नगरसेनकांना दिलेल्या या सुचनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता महापौर पंचम कलानी यांनी सारवासारव केली आहे. आपण केलेलं ते वक्तव्य मस्करीत केलं होतं, असं कलानी यांनी म्हटलं आहे.
मात्र, एकीकडे महापौर पदावर बसून सभागृहात मराठी येत नाही असं म्हणून मराठी भाषेचा अपमान करणं अतिशय निंदनीय आहे. तसेच याच घटनेचा दुसरा पैलू जर आपण पाहिला तर या सभागृहाच्या गदारोळात काही सदस्याकडून महापौर पंचम कलानी यांना शिवीगाळ करण्यात आली. गदारोळात या गोष्टीकडे कुणाचे लक्ष गेलं नसावं किंवा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असावं. तसेच सभागृहात अशा पद्धतीने वागणे आणि मराठी भाषेचा अपमान या दोन्ही गोष्टी या निषेधार्य आहे. महाराष्ट्रात राहून महापौर पदावर एखादा व्यक्ती विराजमान असल्यास त्याला मराठी येणं गरजेचं आहे… परंतु या गोष्टीचा विसर पडलाय की काय असं दृश्य दिसतेय. या व्हिडीओतून जो काही घडलेला प्रकार समोर आलाय तो अत्यंत निषेध करण्यासारखाच आहे.
नेमकं काय घडलं?
मला मराठी येत नाही सिंधीत बोला… महापौरांचा महासभेत मराठीद्वेष्टेपणा
उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत भर महापालिकेच्या महासभेत त्यांनी दाखवलेल्या मराठीद्वेष्टेपणामुळे शहरासह राज्यात नारजी पसरली आहे. उल्हासनगर महापालिकेची महासभा मागील आठवड्यात पार पडली. या महासभेत शहरातल्या पाणीप्रश्नावरुन रणकंदन सुरु होतं. त्यातच शिवसेनेचे नगरसेवक विजय पाटील यांनी मराठीत प्रश्न मांडायला सुरुवात केली. त्यावर महापौर पंचम कलानी यांनी त्यांना थांबवत आपल्याला मराठी येत नसून सिंधीत बोला, असं वक्तव्य केलं.
त्यावर पाटील यांनी तुम्हाला आम्ही सिंधीतही सांगितलं तरी कळत नाही असं प्रत्युत्तर दिलं. मात्र महापौरांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ शहरात व्हायरल झाल्यावंतर शहरात चांगलीच नाराजी पसरली . याबाबत मनसेनं आक्रमक पवित्रा धेतला असून मराछी येत नसेल, तर महापौरांनी राजीनाम द्यावा, अशी भूमिका घेतली.
कोण आहे पंचम कलानी?
पंचम कलानी या माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या सूनबाई आहे. शहरात इतकी वर्ष वास्तव्य करुन आणि शहरावर इतकी वर्ष सत्ता गाजवूनही त्यांना साधं मराठी येत नसल्याबाबत सध्या नाराजी व्यक्त होत आहे.