मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलक निदर्शने करत आहेत. मात्र अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. यात काही आंदोलकांनीं जीव गमावला तर काहींनी आत्महत्या केली. याच आरक्षणावरून औरंगाबादला आणखी तरुणाने आत्महत्या केली आहे. प्रमोद होरे-पाटील असे या तरुणाचे नाव असून त्यांनी मुकुंदवाडी रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
प्रमोद यांनी आत्महत्या करण्या पूर्वी फेसबुक पोस्ट लिहिली असून यात त्यांनी "चला आज एक मराठा जातोय... पण काही तरी... मराठा आरक्षणासाठी करा जय जिजाऊ... आपला प्रमोद पाटील” असा मजकूर लिहिला आहे.