परीक्षा विभागातील गैरव्यवहार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी अभाविपची मागणी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरव्यवहारामुळे जगप्रसिद्ध विद्यापीठाचे वाभाडे निघत आहेत. आयडॉल मधील सदा आमोणकर नावाच्या कर्मचाऱ्यांचे स्वतःचा निकाल बदलवून घेणे, नजीब नावाच्या व्यक्तीने काही विद्यार्थीनी ना पास करून देण्याच्या बदल्यात शारीरिक संबंधाची मागणी करण्याची घटना,रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांच्या बनावट गुणपत्रिका बद्दल काही कर्मचाऱ्यांना अटक होणे, गरवारे इन्स्टिट्यूट मधील उत्तरपत्रिका बदला बद्दल दोन कर्मचाऱ्यांना अटक या सर्व घटना विद्यापीठाला लौकिकाला काळीमा फासणाऱ्या आहेत.
केवळ पोलीस चौकशी वर अवलंबून न राहता परीक्षा विभागातील संबंधित सर्व कर्मचारी व अधिकारी तसेच अन्य त्यांचे हस्तक यांची उच्चस्तरीय चौकशी समिती मार्फत तात्काळ चौकशी करावी व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी करावी अशी मागणी अभाविपचे प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य विद्यार्थ्याला अनेक प्रश्नांना सामोर जावं लागतं आहे त्यातच परीक्षे सारखा संवेदनशील मुद्दा विद्यापीठाने गंभीरपणे हाताळावा. अन्यथा अभाविप ला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.