भीमा- कोरेगाव येथील विजयस्तंभ जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारला देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहेत. येत्या ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात विनंती अर्ज केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून त्या जागेचा ताबा राज्य सरकारकडे सोपवला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी कोरेगाव- भीमा परिसराजवळ झालेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यामुळे यंदा परिस्थिती पुन्हा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या देखरेखीत सगळा कार्यक्रम पार पडणार आहे.