भारतीय जनता पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असं नाव देण्यात आले आहे. हा जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला आहे
भाजप जाहीरनाम्यामध्ये 75 मुद्द्यांवर आश्वासन
१ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर ५ वर्षांपर्यंत कोणतंही व्याज नाही - राजनाथ सिंह
सिटीजनशिप विधेयक लागू करणार - राजनाथ सिंह
तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार - राजनाथ सिंह
प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य - राजनाथ सिंह
राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार, छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार - राजनाथ सिंह
६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेंशन सुरु करणार - राजनाथ सिंह
शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार. सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार - राजनाथ सिंह
जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत दहशतवादाप्रती कठोर भूमिका घेतली जाईल - राजनाथ सिंह
2022 ला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होतायत..ही पंचाहत्तरी साजरी करण्यासाठी 75 संकल्प... अमित शाह