पुणे पोलिसांना मुंबई हायकोर्टाने नक्षली समर्थकांवर केलेल्या कारवाईवरुन चांगलेच फटकारले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली? असा सवाल मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना विचारला आहे. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींचा सीपीआय (माओवादी) संघटनेशी थेट संबंध असल्याचा दावा केला आहे. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण पत्रकार परिषद का घेतली? असा सवाल आता हायकोर्टाने पुणे पोलिसांनी विचारला आहे.
एल्गार परिषदेप्रकरणी दाखल झालेला गुन्हा हा राजकीय दबावापोटी दाखल झालेला गुन्हा असून गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये केलेल्या कारवाईचा तपास पोलिसांना करता येत नाही, हे प्रकरण पुणे पोलिसांकडून एन आय़ ए कडे वर्ग करण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.
या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावनी झाली. यावेळी कोर्टाने पुणे पोलिसांना प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही पत्रकार परिषद का घेतली असा सवाल केला आहे.
हायकोर्टाने सर्व प्रतिवादींना या याचिकेची प्रत न मिळाल्याने ही सुनावणी पुढे ढकलली पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार आहे.