पदवी-पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रांकरीता मुदतवाढ

Update: 2021-01-18 02:38 GMT

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासासा

सरकारने २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी EWS मुळ प्रमाणपत्र, NCL मुळ प्रमाणपत्र, मुळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून ही अंतिम मुदतवाढ आहे. यानंतर कोणत्याही स्वरूपाची मुदत वाढवून देण्यात येणार नाही याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी २० जानेवारीपर्यंत स्वत:च्या लॉगीनमधुन ऑनलाईन पध्दतीने मुळ प्रमाणपत्र सादर करावी. जे उमेदवार मुळ प्रमाणपत्र २० जानेवारी रोजी सायंकाळी ०५.०० पर्यंत सादर करणार नाही, अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करुन त्यांना दुसऱ्या फेरीकरिता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे, अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच पुढील सुधारित वेळापत्रक दिनांक १८ जानेवारी २०२१ नंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Similar News