भाजपच्या विजयाचा अश्वमेध रोखला गेला आहे. पण विरोधकांची पराभूत मानसिकता भाजपाला मदत करत आहे.
आजच्या काळातला विरोधाभास पहा, वर्तमानपत्रातली उद्योग-व्यवसायाची पानं वाचली तर तुम्हाला गंभीर संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेची वर्णनं आणि मोदी सरकारची अकार्यक्षमता याबद्दल वाचायला मिळेल, तर राजकीय पानांवर भारतीय जनता पार्टी एका निवडणुकी मागोमाग दुसर्या निवडणुकीत यशस्वी होत असल्याचं वाचायला मिळेल. पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून बेरोजगारीपर्यंतच्या स्थानिक मुद्द्यांवरील असंतोषाच्या बातम्यांशी महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः हरियाणामध्यल्या निवडणुकांच्या निकालांच्या बातम्यांनी समतोल साधलेलाही दिसेल.
दोन्ही विधानसभा निवडणूकीत, लोकसभेच्या पाच महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मतांचा हिस्सा बऱ्यापैकी खाली आला आहे. उदाहरणार्थ, हरियाणामध्ये भाजपाने ५८ टक्के मतं मिळवली आणि लोकसभेच्या दहाच्या दहा जागांवर विजय मिळविला, तर तब्बल ७९ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. पण आता हरियाणामध्ये आमची विधानसभा त्रिशंकू अवस्थेत आहे. जरी भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी मतदारांच्या वागणुकीत नाट्यपूर्ण बदल घडून आल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने २२० हून अधिक विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली होती, पण आता त्यांनी विधानसभेच्या जवळपास एक चतुर्थांश जागा गमावल्या आहेत.
हे ही वाचा
पराभव कुणाचा…?
अनैसर्गिक प्रयोग करू नका हाच जनतेचा आदेश आहे !
भाजप सेनेला इशारा, विरोधकांना संधी! – निखिल वागळे
साताऱ्यात राजे फुस्स, दोस्ती जिंकली!
भावनिक मुद्दे नाही चालले की भाजपाची राजकीय नौका डुबू लागते !!