सहकार विभागाच्या अखत्यारीतील अडीच लाख सहकारी संस्थांपैकी दीड लाख सहकारी संस्था या गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणीकृत आहेत. इतर सहकारी संस्था या नफ्यासाठी आणि समान उद्देशासाठी काम करतात. परंतु गृहनिर्माण सहकारी संस्था या नफ्यासाठी नसतात. तर विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन राहण्यासाठी असतात, अशा गृहनिर्माण संस्थांमधील वर्षानुवर्षे सुरू असलेले तंटे सोडवण्यासाठी सहकार विभागाने नवी योजना आणली आहे पहा सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडून..