संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या आधी खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला रामराम ठोकणारे तब्बल १४ हजार मतांनी पीछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराचा फटका उदयनराजेंना बसल्याचं बोललं जात आहे.