पैसे घेऊन विदेशी लसीचं प्रमोशन, अग्निहोत्रींचा आरोप, थरूर उचलणार मोठं पाऊल

पैसे घेऊन विदेशी लसीचं प्रोमोशन केल्याच्या विवेक अग्निहोत्री यांच्या आरोपावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;

Update: 2023-09-27 04:00 GMT

विविध चित्रपट किंवा वस्तू विकण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ते अनेक दिग्गज अभिनेते प्रोमोशन करताना दिसतात. यावर सिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी परदेशी लसीच्या प्रोमोशनसाठी खासदार शशी थरूर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले. याला शशी थरूर यांनी उत्तर दिलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांचा OpIndia च्या मुलाखतीचा व्हिडीओ शंतनू यांनी ट्वीट केला आहे. ते The Vaccine War च्या प्रोमोशनसाठी आले होते.  त्यावर त्यांनी म्हटले आहे की, परदेशी लसींच्या प्रोमोशनसाठी शशी थरूर आणि अरविंद केजरीवाल यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले सामान्य लोकांनी चित्रपट प्रोमोशनसाठी पैसे घेतले तर ते ठीक आहे. पण एखाद्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी पैसे घेणे चूक आहे. यामध्ये त्यांनी शशी थरूर आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. 

त्यानंतर सचिन जैन यांनी रिट्वीट करून म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल आणि शशी थरूर यांनी यावर बोललं पाहिजे. नाहीतर ही गोष्ट पुन्हा रिपीट होईल.

यानंतर शशी थरूर यांनी या रिट्वीट करून म्हटले आहे की, ही अत्यंत चीप पब्लिसिटीचा प्रकार आहे. मात्र लोक आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागले आहेत. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News