Ugc Net 2023 : यूजीसी 'नेट' सहा डिसेंबर पासून

Update: 2023-11-20 12:30 GMT

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या 'नेट'परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत 6 ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 'राष्ट्रीय पात्रता चाचणी' यूजीसी नेट करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या दहा दिवस अगोदर WWW.nte.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर 'एन टी ए' कडून परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शहरांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे.

सात डिसेंबरला पहिल्या सत्रामध्ये वाणिज्य विषयाची परीक्षा होईल. तर दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय संस्कृती, संगणकशास्त्र, फ्रेंच, आणि शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा होणार आहे.

या आधी सहा डिसेंबर ला परीक्षेच्या पहिल्या सत्रामध्ये कोकणी, इंग्रजी, हिंदू स्टडीज व इतर काही परकीय भाषांची परीक्षा होणार आहे. इतिहास, मणिपुरी, सिंधी, जर्मनी या विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रामध्ये असतील. अशाप्रकारे दोन सत्रांमध्ये ही परीक्षा रोज होणार आहे. परीक्षा संबंधित संपूर्ण उपयुक्त माहिती WWW.nte.ac.in संकेतस्थळावर प्राप्त आहे.

Tags:    

Similar News