आरक्षणासाठी आदिवासी आमदार एकवटले

Update: 2023-09-26 15:58 GMT

मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच धनगर आरक्षणाची मागणीही विविध संघटनांनी लावून धरलेली आहे. अशा परिस्थितीत आदिवासी समाजाच्या आमदारांनीही आरक्षणासंदर्भात एकी दाखवत आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बैठक घेतली.

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी केली जातेय. त्यावर आदिवासी समाजातून तीव्र प्रतिक्रिया उटल्या. धनगर आरक्षणाला आदिवासी समाजाचा विरोध नाहीये. मात्र, त्यांना अनुसूचित जमातीच्या कोट्यातून आरक्षण न देता, स्वतंत्रपणे आरक्षण दिलं पाहिजे, असा साधारणतः मतप्रवाह आदिवासी समाजामध्ये आहे. त्यामुळं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का न लागू देण्यासाठी आदिवासी समाजाच्या आमदारांनी आज विधानभवनात बैठक घेतली. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी ट्विट करून या बैठकीची माहिती दिली.

Tags:    

Similar News