सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, काँग्रेस खासदाराचा दावा

पाच राज्याच्या निवडणूकीच्या निकालानंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.;

Update: 2022-03-11 06:28 GMT

राज्यात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याबाबत वारंवार विधान केले जाते. त्यातच पाच राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत मोठे विधान केले आहे.

देशातील पाच राज्यांच्या निवडणूकींचा निकाल लागला आहे. त्यामध्ये भाजपने चार राज्यात विजय संपादन करत सत्ता मिळवली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. तर या निवडणूकीत काँग्रेस भुईसपाट झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यसभेचे काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राज्यात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या तारखा दिल्या जातात. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार पडण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर पाचपैकी चार राज्यात भाजपची पुन्हा सत्ता आली आहे. तर काँग्रेस भुईसपाट झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असे वक्तव्य केले आहे. कुमार केतकर हे बीबीसी मराठीशी बोलत होते.

पाच राज्यातील निवडणूक निकालांबाबत कुमार केतकर बीबीसी मराठीशी बोलत होते. यावेळी केतकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारला धोका आहे. त्यातच आता नारायण राणे आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील भाषणं युट्यूबवर आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे.

पुढे बोलताना कुमार केतकर म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी महाराष्ट्र सरकार पडु शकेल.महविकास आघाडीचं सरकार स्थापण झाल्यापासून मी हे च सांगतोय.ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरतं नाही.जे प्रमाणिक लोकांच्या घरी छापे टाकत नाही,उदारानार्थ नारायण राणे आहेत.महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणीजाऊशकेल.म्हणजे आपण आता बोलतोय तर तिकडे सरकारला सुरुंग लावण्याची तयारी सुरु झालेली असेल, असं म्हणत कुमार केतकर यांनी खळबळजनक विधान केलं

Tags:    

Similar News