अर्नब गोस्वामीला सुप्रीम कोर्टानं पुन्हा फटकारलं
सरकारी अजेंडा रेटून वादग्रस्त पत्रकारीता करणारा रिपब्लीक टिव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी पुन्हा एकदा तोंडावर आपटला आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टिव्हीला टार्गेट केलं असून टीआरपी घोटाळा सीबीआयकडे चौकशीला द्या अशी मागणी करणारी अर्णबची याचिका सुप्रिम कोर्टानं आज फेटाळून लावली.;
समाजविघातक पत्रकारीता करणार रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामी मागील महीन्यात अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता. अनेक प्रकरणांमध्ये सध्या त्याच्यावर सुप्रिम कोर्ट आणि उच्च न्यायालयात सुनावण्या सुरु आहे.
सरकारी अजेंडा रेटून वादग्रस्त पत्रकारीता करणारा रिपब्लीक टिव्हीचा संपादक अर्नब गोस्वामी पुन्हा एकदा तोंडावर आपटला आहे. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टिव्हीला टार्गेट केलं असून टीआरपी घोटाळा सीबीआयकडे चौकशीला द्या अशी मागणी करणारी अर्णबची याचिका सुप्रिम कोर्टानं आज फेटाळून लावली.
आज सर्वाच्च न्यायालयात अर्णबने रिपब्लिक टीव्ही आणि मला महाराष्ट्र पोलिसांकडून केलेल्या सक्तीने केलेल्या कारवाईपासून न्यूज चॅनेलच्या सर्व कर्मचार्यांना संरक्षण मिळावे आणि टीआरपी घोट्याळ्याची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरीत करावी अशी मागणी केली होती. न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं "वैयक्तीक महत्वाकांक्षेच्या पोटी अशी याचिका केली असल्याची टिप्पणी करून केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) चौकशी हस्तांतरित करण्याची याचिका तातडीने मागे घेण्याचे आदेश दिले. रिपब्लिक टीव्ही आणि मुख्य संपादक अर्नब गोस्वामी यांनी महाराष्ट्र पोलिसांकडून केलेल्या सक्तीने केलेल्या कारवाईपासून न्यूज चॅनेलच्या सर्व कर्मचार्यांना संरक्षण मिळावे यासाठी दाखल केलेल्या याचिकेचे सुप्रीम कोर्टाने सोमवारी नकार दर्शवले.
रिपब्लिक टीव्ही आणी माझ्या कर्मचार्यांना महाराष्ट्र पोलिसांनी सातत्याने वेठीस धरले आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्यापुढे सुनावणीसाठी आली होती. "ही याचिका म्हणजे वैयक्तीक महत्वाकांक्षी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचार्यास अटक न करता तपास सीबीआयकडे द्यावा अशी तुमची इच्छा आहे. आपण ही केस मागे घ्या," असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. त्यानंतर गोस्वामी यांचे वकील मिलिंद साठे यांनी कोर्टाने गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही योग्य व्यासपीठावर याचिका मांडेल असे सांगून याचिका मागे घेतली.