परिचारिकांच्या मागण्या मान्य ; संप मागे

Update: 2022-06-01 09:50 GMT

राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी २८ मेपासून पुकारलेला बेमुदत संपामुळे विस्कळीत झालेली वैद्यकीय सेवा आता रुळावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिचारिकांच्या मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे यांनी जाहीर केले.

परिचारिकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून पुढील कार्यवाही करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ जुलै पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि परिचारिका संघटनेमधे काला दिर्घत सकारात्मक चर्चा झाली होती. या बैठकीचे इतिवृत्त हाती पडल्यानंतर अखेर आज(बुधवार) संप मागे घेतल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष डॉ मनीषा शिंदे यांनी केली आहे.

परिचारिकांची विनंती आधारित बदली करण्यासह पदभरती, पदोन्नती इत्यादी बऱ्याच काळापासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी २८ मेपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यभरातील हजारो परिचारिका बेमुदत संपावर गेल्याने मुंबईतील जे जे रुग्णालय, जी टी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयासह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. अनेक शस्त्रक्रिया देखील रद्द करण्यात आल्याने वैद्यकीय सेवा विस्कळी झाल्या होत्या.

सरकारने आंदोलनाची दखल घेतल्यानंतर मंत्रालयात अमित देशमुख आणि संघटनांमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व मागण्यांवर चर्चा झाली आणि या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन यावेळी देशमुख यांनी दिले होते. मात्र त्याचवेळी या मागण्या पूर्ण करण्यासाठी किमान एक महिना लागेल, असेही स्पष्ट केले होते. एकूणच चर्चा सकारात्मक झाल्याने रात्रीपर्यंत संप मागे घेतला जाईल असा अंदाज आहे.

बैठकीचे इतिवृत्त हाती न मिळाल्याने संप सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा डॉ मनीषा शिंदे यांनी सुरवाती दिली होती. यानंतर आज बैठकीचे इतिवृत्त हाती मिळाल्यानंतर सहकाऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाचे घोषीत करण्यात आलं.

Tags:    

Similar News