संसर्गाच्या भीतीने मुलाचा वडिलांच्या अंत्यसंस्काराला नकार, पोलीस, अधिकारी आणि पत्रकारांचा पुढाकार

Update: 2021-05-02 05:37 GMT

रायगड : कोरोनामुळे माणसातील माणूसपण हरवल्याची अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. आपल्याच कुटुंबातील सदस्याला देखील लोक परकेपणाची वागणूक देत असल्याचे समोर येत आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात मनाला हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वडील कोरोना संक्रमित असल्याच्या संशयाने मुलाने, नातेवाईकांनी आणि गावातील नागरिकांनी अंत्यविधीला करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर प्रशासनातील अधिकाऱ्यांना अंत्यविधी करावा लागला आहे.

केळटे बौधवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव या ७६ वर्षांच्या वृद्धाचे अचानक निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र नंतर तो बरा होऊन घरी परतला. पण गोविंद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी व गावातील नागरिकांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला. यानंतर काही ग्रामस्थांनी म्हसळा तालुक्यातील मंडळाधिकारी दत्ता कर्चे यांना संपर्क साधला. यानंतर तहसीलदार पोलीस आणि पत्रकार निकेश कोकचा यांनी यासाठी पुढाकार घेतला. केळटे बौधवादी येथे गेल्यानंतर तिर्डी बनवण्यापासून ते २ किलोमीटर लांब स्मशानभूमीपर्यंत मृतदेह खांद्यावर नेण्याचे काम म्हसळा मंडळाधिकारी दत्ता कर्चे , पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस नाईक सुर्यकांत जाधव, पत्रकार निकेश कोकचा, पोलीस शिपाई कदम, शरद नांदगावकर व भरत चव्हाण यांनी केले आहे. विशेष म्हणजे पीपीई किट घालून त्यांनी अंत्यविधी केले.

Tags:    

Similar News