संजय राऊत सुटले; नवाब मलिक, अनिल देशमुखांचं काय?

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना PMLA कोर्टाने जामीन दिला. त्यामुळे संजय राऊत सुटले. पण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Update: 2022-11-24 06:50 GMT

गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. मात्र विशेष न्यायालयाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या मनी लाँडरींग प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआय चौकशी सुरु असल्याने अनिल देशमुख अजून तुरुंगात आहेत. त्याबरोबरच माजी मंत्री नवाब मलिक हे दाऊदशी संबंधीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीनावर सुनावणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या जामीनावर मुंबई सत्र न्यायालय निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना जेल की बेल? हे ठरणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. या घटनेला एक वर्ष पुर्ण झाले आहे. अनिल देशमुख यांना ED प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयची चौकशी सुरू असल्याने अनिल देशमुख तुरुंगातच आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्यापोठापाठ नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना जामीन मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


Tags:    

Similar News