Russia Ukraine war : अमेरीकेचा रशियाला मोठा धक्का

रशिया युक्रेन युध्द सलग 14 व्या दिवशीही सुरूच आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही.

Update: 2022-03-09 04:04 GMT

रशिया युक्रेन युध्द सलग 14 व्या दिवशीही सुरूच आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. तर एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे युध्द थांबवण्यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढत आहे. त्यातच अमेरीकेने रशियाची कोंडी करण्यासाठी मोठा निर्णय घेत रशियाला धक्का दिला आहे.

रशिया युक्रेन युध्द 14 दिवसानंतरही सुरूच आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरून युध्द थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणला जात आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सर्वाधिक देशांनी रशियाच्या विरोधात भुमिका घेतली. त्यातच अमेरीका आणि युरोपियन युनियन आणि युक्रेनने रशियाची खाती गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही पुतीन यांनी युध्द न थांबवल्याने रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले. मात्र रशियाने अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या निर्बंधांना दाद दिली नाही. त्यामुळे अखेर पुतीन यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पत्रकारांशी संवाद साधत सांगितले की, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दामुळे जगाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अमेरीका रशियातून आयात करण्यात येत असलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूंच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेत आहे, असे जो बायडन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अमेरीकेने रशियातून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात बंद केल्यास त्याचा गंभीर परिणाम रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

अमेरीकेने रशियाविरोधात टाकलेल्या पाऊलामुळे रशिया युध्द थांबवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Tags:    

Similar News