देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंच्या वादावर रक्षा खडसेंचा सल्ला, पाहा काय म्हणाल्या

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-04-20 10:14 GMT
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंच्या वादावर रक्षा खडसेंचा सल्ला, पाहा काय म्हणाल्या
  • whatsapp icon

रेमडेसीवीर इंजेक्शनचं राजकारण चांगलंच तापलं असतांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांनी कुत्र्या मांजरासारखं विरोधी पक्षांनं वागू नये. अशी टीका केली आहे. या टिकेसंदर्भात भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याशी आमचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी बातचीत केली असता... त्यांनी ही वेळ राजकारणाची नसून मदत करण्याची आहे. आहे असा सल्ला दिला आहे.रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. राज्याने गडकरींचा आदर्श घ्यावा...

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गडकरींनी राज्य सरकारवर कोणताही आरोप न करता राजकारण केलं नाही, केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोरोना आटोक्यात आणण्यात मोठा वाटा उचलला आहे. गडकरींचा हा आदर्श राज्यसरकारनं घ्यायला हवा तसंच ही वेळ राजकारणाची नसून केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वय साधला पाहिजे. तो का साधला जात नाही. असा सवाल भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आघाडी सरकारला केला आहे .

राज्यातील मंत्र्यांनी केंद्रावर आरोप करण्यापेक्षा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधून राज्यासाठी मदत का करत नाही? असा सवाल ही आघाडी सरकारच्या मंत्र्यांना भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. पीएम केअर फंड मधून राज्यभरातील जिल्ह्यात व्हेंटिलेटर दिले आहेत. त्यातील अनेक नादुरुस्त याकडे सरकार आणि प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. असं ही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News