पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक पुल आज प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या संपणार आहे. पुण्यातील चांदणी चौक उड्डणपुलाचे लोकर्पण आज होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी या पुलाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या चांदणी चौक पुलाच बांधकाम हे पुढील ५० वर्षांचा विचार करुन उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला दीड लाख वाहने या ठिकाणावरुन सुसाट धावू शकतील. १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे.
कोणत्या प्रवाशांना या चांदणी चौकातील रस्त्या फायदा होणार पाहा
मुंबईवरुन साताऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सेवा रस्ते
मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधन, मुळशी आणि एनडीएकडून कोथरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती.
पुलाला लागलेला खर्च व कालावधी
प्रकल्पासाठी ८६५ कोटी रुपये खर्च
८३ हजार क्यूबिक मीटर क्राँक्रीटचा वापर
५ हजार ७५० मेट्रिक टन स्टीलचा वापर
फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३ कालावधीत पुलाचे काम पूर्ण