#MulayamSinghYadav : पंतप्रधान मोदींनी दिला मुलायम सिंह यांच्या आठवणींना उजाळा

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रदान मोदींनी दुखः व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Update: 2022-10-10 07:09 GMT

सोमवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी गुरग्रामच्या मेदांता रूग्णालयात मुलायनम सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या ८२ वर्षांच्या आयुष्यात ५५ वर्षांची राजकीय कारकीर्द होती. त्यांच्या निधनानंतर उत्तरप्रदेशच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुलायम सिंह यादव यांच्यासोबतचे काही फोटोज शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. "श्री मुलायम सिंह यादवजी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली. त्यांनी तत्परतेने लोकांची सेवा केली आणि लोकनायक जेपी आणि डॉ. लोहिया यांच्या आदर्शांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले." असं ट्विट त्यांनी केलं आहे त्यासोबत त्यांनी मुलायमसिंह यांच्यासोबतचे पंतप्रधान झाल्यानंतरचे फोटो टाकले आहेत.

"मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःला वेगळे केले. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीचे प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप अभ्यासपूर्ण होते आणि राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला."

याशिवाय मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह यादव यांच्या भेटीचे काही फोटोज पंतप्रधानांनी पोस्ट केले आहेत आणि तेव्हाच्या आठवणी सामायिक केल्या आहेत. "आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना मुलायमसिंह यादव यांच्याशी माझा अनेक संवाद झाला. जवळचा सहवास चालू राहिला आणि मी नेहमीच त्यांची मते ऐकण्यासाठी उत्सुक होतो. त्यांच्या निधनाने मला वेदना होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्या संवेदना. ओम शांती."

मुलायम सिंह यांच्यावर त्यांच्या जन्मगावी सैफई येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News