Phone Tapping case : वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना बढती
Phone Tapping Case : राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात आरोप असलेल्या वादग्रस्त पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सरकारने बढती दिली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas aghadi) असताना राज्यभर गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणातील (Phone Tapping case) वादग्रस्त पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कॅबिनेट नियुक्ती समितीने 1988 ते 1999 दरम्यानच्या काळातील 20 अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी (Atulchandra kulkarni) आणि एटीएस प्रमुख सदानंद दाते (Sadanand Date) यांना पोलिस महासंचालक पदी बढती देण्यात आली आहे.
फोन टॅपिंग वाद काय आहे?
राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार असताना 2016 ते 2018 दरम्यान रश्मी शुक्ला या पुणे (Pune police commissioner) शहराच्या पोलिस आयुक्त म्हणून काम करीत होत्या. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut), नाना पटोले (Nana patole), संजय काकडे (Sanjay Kakde), आशिष देशमुख( Ashish Deshmukh), बच्चू कडू (Bacchu kadu), एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा चौकशी अहवाल समोर आला होता. त्यानंतर राज्याचे अधिवेशन फोन टॅपिंग प्रकरणावरून चांगलेच गाजले होते. तर या प्रकरणी तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुणे शहरातील बंड गार्डन पोलिस (Band Guarden police Station) ठाण्यात आणि कुलाबा पोलिस ठाण्यात (Kulaba) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अखेर शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारने रश्मी शुक्ला यांना निर्दोष जाहीर केले.
राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे विरोधी पक्षांनी केलेला व्यक्त केलेला संशय गहिरा होत होता. त्यापाठोपाठ रश्मी शुक्ला यांना मिळालेल्या बढतीमुळे पुन्हा आश्चर्य व्यक्त केले जात आहे.