बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात कोरोनाचा शिरकाव
गरज पडल्यास योगगुरू रामदेव बाबांची कोरोना चाचणी केली जाणार
मुंबई: देशभरात वाढत असलेल्या कोरोनाने आता योगगुरूबाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात एन्ट्री केली असून,त्यांच्या विविध संस्थेत आतपर्यंत 83 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात 46, योगग्राममध्ये 28 आणि आचार्यकुलममध्ये 9 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. या नंतर आता तिन्ही संस्थांमध्ये संपर्क आलेल्या लोकांची ट्रेसिंग केले जात आहे. गरज पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली, योगग्राममध्ये 28 आणि आचार्यकुलममध्ये 9 कोरोनांमध्ये संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.
हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी सांगितलं, 10 एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 83 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या कोरोना रुग्णांना पतंजली परिसरात आयसोलेट करण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर, तिन्ही संस्थांमध्ये संपर्कात आलेल्या लोकांची ट्रेसिंग करण्यात येत आहे. तसेच गरज पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
मात्र असे असतानाही पतंजलीकडून माध्यमात आलेल्या बातम्या खोट्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.पतंजलीत कुणीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले नाहीत, कारण प्रवेश देताना प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाते, जर कुणी पॉझिटिव्ह आढळून आला तर त्याला प्रवेश दिला जात नाही,असही पतंजलीकडून खुलासा करण्यात आला आहे.