माजी मंत्री पंकजा मुंडे या विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्या संदर्भात कागदपत्रांची जमवाजमव सुरु करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं असून या ट्विट मध्ये
कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधना मुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहे. माझ्या ई-मेल वरून माझ्या pa ने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला ते कोणी viral केलं. बातमी झाल्यावर मला कल्पना आली स्पष्ट करत आहे.
असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही.सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधना मुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहे.माझ्या ई-मेल वरून माझ्या pa ने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला ते कोणी viral केलं बातमी झाल्यावर मला कल्पना आली स्पष्ट करत आहे
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 6, 2020
विधानपरिषेतील ९ जागांसाठी येत्या २१ मे ला मतदान होणार आहे. या लढतीत भाजपचा ३ ते ४ जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातंय.
विधानसभा निवडणूकीतील दारुण पराभवानंतर पंकजा यांनी भाजप कोअर कमिटीतीतील पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यानच्या काळात गोपीनाथ गडावरील सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्या वर तोफ डागली होती.
सोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह वाढलेली जवळीक भाजपच्या चिंतेत वाढ झाली होती. या दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे य़ांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानुसार पंकजा यांना विधानपरिषदेचं तिकिट दिलं जात असल्याचं बोललं जात आहे.