सुप्रीम कोर्ट कुणाच्या इशाऱ्यावर काम करतंय? शिवसेनेचा लोकसभेत हल्ला

परमबीर सिंह यांना वारंवार अटकेपासून संरक्षण देणाऱ्या सुप्रीम कोर्टावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. न्याव्यवस्था आणि मोदी सरकारला थेट सवाल विचारणारे अरविंद सावंत यांचे लोकसभेतील भाषण;

Update: 2021-12-08 11:50 GMT

खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असलेले आरोप करुन पळून गेलेल्या परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्ट वारंवार अटकेपासून संरक्षण का देत आहे. असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. अरविंद सावंत यांनी न्यायाधीशांच्या पेन्शन विधेयकावरील चर्चेत सर्वोच्च न्यायालयावर आणि एकूणच न्यायव्यवस्थेवर थेट शब्दात टीका केली परमबीर यांनी आरोप केले आणि ते पळून गेले. या पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देत आहे, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही त्यांनी थेट बोट ठेवले.

केंद्रीय मंत्रणाचा गैरवापर करुन अनेकांना तुरुंगात डांबले जाते आहे. ते निर्दोष असल्याने कोर्ट त्यांना मुक्त करत आहे. पण ज्या यंत्रणांनी त्या लोकांना अटक केली त्या यंत्रणांवर काहीही कारवाई का होत नाही, असा थेट सवाल सावंत यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने राज्यपालाना दिलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या यादीवर अजूनही कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा का घातली जात नाही, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला.

Tags:    

Similar News