केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिल्यानंतर आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. पण चर्चेच्या पहिल्या फेरीत कोणताही तोडगा न निघता ही बैठक संपली आहे. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांची नेत्यांनी जाहीर केला आहे. आता चर्चेची दुसरी फेरी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. पण या बैठकीत तोडहगा निघाला नसला तरी चर्चा सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया एका शेतकरी नेत्याने दिली. पुढील फेरीमध्ये हे नवीन कायदे रद्द करण्याबाबत आम्ही सरकारला तयार करु शकतो असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीमधील विज्ञान भवनमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि व्यापर मंत्री पियुष गोयल यांची शेतकऱी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काही तास बैठक झाली आहे. या बैठकीला शेतकऱी संघटनांचे जवळपास ३५ प्रतिनिधी उपस्थित आहेत.
बैठक संपल्यानंतर शेतकरी नेते चंदा सिंग यांनी सांगितले की तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारने आम्ही तोडगा किंवा बंदुकीच्या गोळ्या काही तरी घेऊन जाणारच असा इशाराही दिला आहे.
सरकारचा प्रस्ताव फेटाळला
सरकारने ११ सदस्यांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती पंजाबच्या भारतीय किसान संघटनेचे नेते सुरजीत सिंग यांनी माहिती दिली. या कमिटीमध्ये ५ सदस्य सरकारचे तर शेतकरी संघटनांचे ६ प्रतिनिधी असतली असंही सरकारने सांगितले पण हा प्रस्ताव फेटाळत शेतकरहीविरोधी कायदे रद्द केले जावे अशी मागणी केल्याची माहितीही त्यांनी दिली. कायदे रद्द होत नाही त तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केले आहे.