कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग राज्यात वाढत असताना लॉकडाऊन नाही पंरतू गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील, असं मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाचे दररोज 35 ते 40 हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे.
गर्दी कशी कमी होईल, यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी त्यांना मुंबई लोकलबाबत प्रश्न विचारला असता, मुंबई लोकल बंद होणार नाही, लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. नागपुरातील रुग्णवाढ चिंतेची असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मुंबई लोकल बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. रुग्णसंख्या वाढत असली तरी बेड कसे वाढतील याकडे लक्ष आहे. अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.