नागपूर यथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरलं आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम दाखवणारे आज शांत का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
‘सत्ता उपभोगण्यासाठी किती लाचारी बाळगायची, सत्तेसाठी सौदेबाजीची आवश्यकता नाही.’ अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली आहे.
“राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्या संदर्भात देशभरात उद्रेक सुरू झाला असून, जोपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन शांत होणार नाही.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पाहा व्हिडीओ...