नागपूर - उ. प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्ये विरोधात नागपुरात महाविकास आघाडीतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. नागपुरातील व्हरायटी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आली.