मुस्लिम धर्मप्रचारक मुक्ती सलमान हजारी यांना अटक

Update: 2024-02-05 03:08 GMT

Mumbai : गुजरातमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारे मुंबईतील एक मुस्लिम धर्मप्रचारक मुक्ती सलमान हजारी (Mufti Salman Azhari) यांना रविवारी गुजरात पोलिसांनी घाटकोपर येथून ताब्यात घेतले. हजारी यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हजारी (Salman Azhari) यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधाने केली होती. या विधानांमुळे वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्यावर जुनागढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारावर गुजरात पोलिसांनी रविवारी हजारी यांना ताब्यात घेण्यासाठी घाटकोपरमध्ये धडक दिली.

हजारी यांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळासाठी त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यावेळी, हजारी यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली. हजारी यांनी स्वतः समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर गुजरात पोलिस त्यांना ताब्यात घेऊन गुजरातला रवाना झाले.

Tags:    

Similar News