सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचे सगळ्यात पहिले ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. पदभार स्वीकारताच नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.