नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगाबादमध्ये बस फोडली

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल प्रक्रिया शांतपणे पार पडत असताना औरंगाबादमध्ये मात्र नामांतराच्या मुद्द्यावरून बस फोडण्यात आल्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे.;

Update: 2021-01-18 13:33 GMT

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात बस डिपोत उभा असलेल्या बसवर संभाजीनगर नाव लिहिलेले असल्याने अज्ञात तरुणांनी दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या आहेत.त्यामुळे पुन्हा औरंगाबाद जिल्ह्याच्या नाव बदलण्याच्या मुद्यावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत असून सुद्धा एकमेकांच्या विरोधात आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजप कडूनही शिवसेनेला टार्गेट केले जात आहे.त्यामुळे ह्या मुद्यांवरून आता राजकीय वातावरण अधिकच गंभीर होत असल्याचं दिसत आहे।

Tags:    

Similar News