मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना तुम्हाला शिवसेनेने लावलेले कंदिल आणि झेंडे दिसत नाहीत का? मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर संदीप देशपांडे यांची चौकशी करण्यात आली. दिवाळीचे अनधिकृत कंदिल काढण्यावरुन संदीप देशपांडे यांचा वॉर्ड ऑफिसरसोबत वाद झाला होता. याप्रकरणी जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी तक्रार केली होती.