आदिवासी समाजबांधवांना आर्थिक हातभार लावण्यासाठी 'खावटी अनुदान योजना'- आ.विखे
कोरोनामुळे राज्यातील आदिवासी समाजबांधवांना आर्थिक हातभार लावावा या दृष्टीने राहाता तालुक्यात खावटी अनुदान योजनेमार्फत किटचे वाटप करण्यात आले. भाजप आमदार राधाकृष्ण विखे यांनी या किटचे वाटप केले.
अहमदनगर : आदिवासी समाजबांधवांना खावटी अनुदान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील किराणामाल किटवाटप करण्यास आदिवासी विकास महामंडळाने सुरवात केली आहे. राज्यातील तब्बल 1 हजार 264 लाभार्थ्यांना किटवाटप करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे आदिवासी कुटूंबियांना मंजूर झालेल्या खावटी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना धान्याच्या किटचे वितरण करण्यात आले. भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे राज्यातील आदिवासी समाजबांधवांना आर्थिक हातभार लावावा या दृष्टीने खावटी अनुदान योजनेमार्फत हि मदत दिली जात असते. यामुळे नागरिकांना संकटकाळात मोठा दिलासा मिळतो. आदिवासी समाजबांधवांना आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने शासनाने खावटी अनुदान योजना पुनरुज्जीवित केली आणि खावटीसाठी 464 कोटी रुपये मंजूर केले. राज्यातील लाभार्थ्यांना दोन हजार रुपये रोख आणि दोन हजारांचा किराणामाल असे दोन टप्प्यात खावटीचे अनुदान वितरित करण्यात येणार होते. त्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे.
राहता येथे या किटवाटप याप्रसंगी आदिवासी प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, सहायय प्रकल्प अधिकारी सुनील बोरसे, समनव्ययक अंबादास बागुल,पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे, जिल्हा परिषदेच्या सदस्या कविता लहारे, शाम माळी, लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे, पंचायत समिती सदस्या अर्चना आहेर, सुवर्णा तेलोरे , गोदावरी दूध संघाचे भागवत धनवटे, माजी उपसरपंच विजय धनवटे , ह.भ.प.रामानंद गिरी महाराज, वाकडीकचे सरपंच डॉ.संपतराव शेळके, गणेश कारखान्याचे संचालक विशाल चव्हाण, सह आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.