विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघात पुन्हा एकदा रंगतदार लढाई पहायला मिळेल. या मतदारसंघातून २०१४ साली हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळे यांचा पराभव केला होता. परंतु २००४ आणि २००९ मध्ये कल्याण काळे यांनी हरिभाऊ बागडे यांना मात दिली होती.
२०१४ मध्ये मोदी लाटेमुळे हरिभाऊ बागडे यांचा विजय झाला होता असं काहीच मत होत. परंतु या वर्षी हरिभाऊ बागडे यांच्यासाठी हि निवडणूक तिळमात्र सोपी जाणार नाहीय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जगन्नाथ रिढे हे कुणाची मते खाणार, तर भाजपचे बंडखोर उमेदवार विकास दांडगे हे किती मते घेतात यावर निकाल अवलंबून राहील.