१९६२ पासून आत्तापर्यंत गोरेगाव या मतदारसंघात फक्त १९८० च्या निवडणुकांमध्येच काँग्रेसचे उमेदवार सी. एम. शर्मा निवडून आले आहेत. इतर वेळी इथल्या मतदारांनी उजव्या विचारसरणीच्या भाजप आणि शिवसेनेलाच पसंती दिली आहे. २००४ आणि २००९ मध्ये शिवसेनेचे सुभाष देसाई इथे निवडून आले आहेत. लोकसभा मतदानाच्या विरोधात जाऊन या मतदारसंघाने काँग्रेसला नाकारून भाजप-शिवसेनेला साथ दिली.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा