एक मराठा लाख मराठा म्हणण्या एवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं- पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी बीडमध्ये मराठा आरक्षावर भाष्य केलं आहे. 'एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं. असा सल्ला भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलन कर्त्यांना दिला

Update: 2024-01-28 11:43 GMT

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच अभिनंदन पंकजा मुंडेंनी केल आहे. 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लागणार नाही. मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते. मात्र धक्का लागलाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं. त्यामुळे धक्का लागला नाही, असं म्हणणे अयोग्य आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातून मुंबईच्या वाशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वाशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

लोकांमधील वितुष्ट कमी करावं, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अस सरकारकडून म्हटल जात आहे. यावर बोलतांना पंकजा मुंडे सरकार ला सल्ला देत म्हणाल्या आहेत की सरकारने ओबीसीला धक्का कसा लागला नाही ? हे समजावून सांगावं, असं आवाहन मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केल आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी बीडमध्ये मराठा आरक्षावर भाष्य केलं आहे. 'एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं. असा सल्ला भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी  मराठा आंदोलन कर्त्यांना दिला 

Tags:    

Similar News