भाजप खासदाराने शेतकऱ्यावर चालवली गाडी, शेतकऱ्यांचा आरोप...
लखीमपूर खेरी नंतर भाजप खासदारावर शेतकऱ्यावर गाडी चालवल्याचा आरोप... काय आहे संपुर्ण प्रकरण?;
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये मोदी सरकारच्या मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप होत आहे. असताना आता हरियाणामध्ये भाजप खासदारावर असाच आरोप केला जात आहे.
भाजपचे खासदार नायब सैनी यांच्यावर आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप आहे. यामध्ये एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जखमी रुग्णांवर अंबालाजवळील नारायणगड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नक्की काय आहे प्रकरण?
काय झालं?
'एनडीटीव्ही' नुसार, भाजप खासदार नायब सैनी हरियाणाच्या नारायणगढ येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. सैनी भवनात झालेल्या या कार्यक्रमाला नायब सैनी व्यतिरिक्त, मूलचंद शर्मा आणि इतर देखील उपस्थित होते.
शेतकर्यांचा मोठा गट सैनी भवनाच्या बाहेर भाजप नेत्यांचा विरोध करत होता. जेव्हा कार्यक्रम संपला आणि लोक बाहेर आले तेव्हा नायब सैनी यांच्या गाडीने एका शेतकऱ्याला धडक दिली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. असा आरोप केला जात आहे.
जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहेत. नायब सैनी हे कुरुक्षेत्रातून भाजपचे खासदार आहेत.
दरम्यान हा आरोप लखीमपूर खेरीच्या घटनेनंतर केला जात असल्यानं जनतेत मोठा रोष व्यक्त केला जात आहे.
लखीमपूर खेरी काय आहे प्रकरण?
काय आहे प्रकरण?
रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.