गुणरत्न सदावर्तेंना धक्का, सातारा पोलीस घेणार ताब्यात

गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र कोर्टात काय युक्तीवाद झाला? तसेच नागपुर कनेक्शनचे काय झाले? हे पाहुयात...;

Update: 2022-04-13 14:45 GMT

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक (Silver oak) या निवासस्थानी एसटी कामगारांनी हल्ला केला होता. त्याप्रकरणी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानतंर आज गिरगाव कोर्टाने सदावर्ते (Girgaon court) यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (ST worker attack on silver oak)

सिल्वर ओकवर एसटी कामगारांनी चपला फेकत निदर्शने केली होती. याचा कट रचल्याचा आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदावर्ते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर पोलिस कोठडी पुर्ण झाल्यानंतर आज पुन्हा गिरगाव न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे. दरम्यान सातारा पोलिस सदावर्ते यांना ताब्यात घेणार आहेत. त्यामुळे न्यायालयिन कोठडीमुळे सदावर्ते यांना दिलासा मिळण्याची शक्यता असतानाच सातारा पोलिस ताब्यात घेणार असल्याने सदावर्ते यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Gunratna sadavarte remanded in judicial Custody)

सदावर्तेंना सातारा पोलिस का घेणार ताब्यात?

गुणरत्न सदावर्ते यांनी काही दिवसांपुर्वी छत्रपती घराण्याबाबत बदनामी करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना 17 एप्रिल पर्यंत ताब्यात घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिस ताब्यात घेणार आहेत (Satara police arrest to adv. Gunratna sadavarte)

काय झाला युक्तीवाद?

गुणरत्न सदावर्ते यांनी 4 दिवसांची पोलिस कोठडी पुर्ण केली. त्यानंतर आज गिरगाव न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी दोन्ही पक्षांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे Adv. प्रदीप घरत यांनी तर सदावर्ते यांच्यावतीने Adv. मृण्मयी कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला.

Adv. प्रदीप घरत यांचा युक्तीवाद (Pradip Gharat)

  • विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुरावे मिळत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्याची मागणी केली.
  • गुणरत्न सदावर्ते यांच्या डायरीत अनेक पैशांच्या नोंदी आहेत. त्यामुळे एसटी कामगारांकडून घेतलेले पैसे कुठे खर्च केले. याचा तपास करण्यासाठी तसेच कामगारांकडून जमा केलेले २ कोटी रुपये याबाबत चौकशी करण्यासाठी आणि या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून जयश्री पाटील यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी घरत यांनी केली. मात्र या युक्तीवादाला गुणरत्न सदावर्ते यांच्या वकील मृण्मयी कुलकर्णी यांनी जोरदार विरोध करत सर्व मुद्दे खोडून काढले.

मृण्मयी कुलकर्णी यांचा युक्तीवाद (Mrunmayi Kulkarni)

  • मृण्मयी कुलकर्णी यांनी आरोप खोडून काढताना म्हटले की, जयश्री पाटील या फरार नाहीत. तसेच जयश्री पाटील यांच्याविरोधात ठोस पुरावे असतील तर सादर करा. मात्र सरकारी पक्ष जयश्री पाटील यांच्याविरोधात ठोस पुरावे सादर करू शकला नाही. त्यामुळे मृण्मयी कुलकर्णी यांनी सरकारी पक्षाने जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी खोडून काढली.
  • तसेच गुणरत्न सदावर्ते यांची डायरी आणि मोबाईल तुमच्याकडे आहे. मग सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची मागणी का? असा सवाल मृण्मयी कुलकर्णी यांनी केला. तसेच पोलिसांपासून सदावर्ते यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप कुलकर्णी यांनी केला.

त्यामुळे सदावर्ते यांना पोलिस कोठडी देऊ नये, असे मृण्मयी कुलकर्णी यांनी म्हटले. तर अशा प्रकारे एक तास युक्तीवादानंतर गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र सदावर्ते यांना जुन्या प्रकरणात सातारा पोलिस ताब्यात घेणार आहेत. त्यामुळे हा त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Tags:    

Similar News