मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याला रेमडीसीवीरच्या साठेबाजी प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचे अन्य सहकारी त्या ठिकाणी पोहचले. याप्रकरणी आता फडणवीस आणि दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी सूचक विधान केले आहे.
जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाप्रकारे पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. असा इशारा देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.