महागाईचे सावट माघी गणेशोत्सवाच्या गणेशमूर्तीवर...

Update: 2023-01-23 11:19 GMT

माघी गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हाथ फिरवताना दिसत आहेत. कोरोनाच्या कालखंडानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करताना गणेश भक्त दिसत आहेत. मात्र यावर्षी गणेशमूर्ती ४० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत.

वर्षभरात गणपतीच्या अवताराचे तीन जन्मदिवस साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करुन आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुल्क चतुर्थीवा गणेश जयंती म्हणून साजरा करीत असतो. मात्र यंदाच्या माघी गणेशोत्सवाला महागाईच्या झळा बसलेल्या पाहायला मिळत आहेत. यावर्षी गणपतीच्या मूर्त्या ४० टक्क्यांनी महागल्या असल्याचे मूर्तीकार सांगत आहेत.

येत्या २५ जानेवारी रोजी देशभरात माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. यासाठी मुंबईतील मूर्तीकार सज्ज झालेले आहेत. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदा माघी गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांमध्ये थोडे नाराजीचे वातावरण आहे. कारण यावर्षी मुर्तीच्या किंमतीमध्ये ४० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. तरी मुंबईकर गणेश भक्त माघी गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणार कच्चा माल महाग झाल्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशमूर्ती महागल्या आहेत. तरी सुद्धा गणेशभक्तांचा आनंद कमी झालेला नाहीए. तर अधिक उत्साहाने माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे भावना गणेश भक्तांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News