माजी खासदार विजय दर्डांसह मुलगा देवेंद्रला ४ वर्षांचा तुरूंगवास

काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांना दिल्लीच्या न्यायालयानं ४ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावलीय. छत्तीसगड इथल्या कोळसा खाण वाटपातील घोटाळ्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीय.;

Update: 2023-07-26 09:59 GMT

जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. या कंपनीचे संचालक मनोजकुमार जायस्वाल यांनाही चार वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. शिवाय कोळसा विभागाचे माजी सचिव एच.सी. गुप्ता आणि अन्य दोन अधिकारी के.एस.क्रोफा आणि के.सी. समारिया यांनाही तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा दिल्ली न्यायालयानं सुनावलीय. या सगळ्यांनी संगनमत करून छत्तीसगडमध्ये कोळसा खाण वाटपात गैरकारभार केल्याचा ठपका न्यायालयानं ठेवलाय. याशिवाय कोर्टानं संबंधित कंपनीला ५० लाख रूपयांचा दंडही ठोठावलाय.

भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब नुसार आणि कलम ४२० नुसार या महिन्याच्या सुरूवातीलाच विशेष न्यायाधीश संजय बंसल यांनी या सर्वांना दोषी ठरवलं होतं. दरम्यान, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) नं सांगितलं की, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं केलेल्या खाण वाटप प्रकऱणात १३ जणांना दोषी ठरवलंय.

दरम्यान, याप्रकऱणी आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षेची मागणी सीबीआयतर्फे कोर्टाला करण्यात आली. सीबीआयनं कोर्टाला सांगितलं की, या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र यांनी सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं याप्रकऱणात सिन्हा यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. सिन्हा यांचा या प्रकरणात सहभाग आहे की नाही, याची चौकशी हे पथक करणार आहे.

सीबीआयचे ज्येष्ठ सरकारी वकील ए.पी. सिंग यांना दावा केलाय की, जायस्वाल यांच्याकडून याप्रकरणातील साक्षीदारांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्याविरोधात पुरावे न देण्यासंदर्भात जायस्वाल यांनी साक्षीदाराला धमकावल्याचंही सिंग यांना कोर्टाला सांगितलं.





 


Tags:    

Similar News