मध्यप्रदेशात वीज बिलाची सक्तीने वसुली, दलित महिलेच्या घरातील वस्तू केल्या जप्त
मध्य प्रदेशात वीजबिल वसुलीसाठी दलित महिलेच्या घरातील वस्तू जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.;
राज्यात महविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) सरकार असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) धर्तीवर महाराष्ट्रातील वीजबिल (Maharashtra electrical bill) माफ करण्याची मागणी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मध्यप्रदेश सरकारचा दाखला दिला होता. त्या मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातून (sagar district, MP) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात वीजबिल न भरल्याने मध्य प्रदेश विद्युत बोर्डाच्या(MPEB) कर्मचाऱ्यांनी दलित महिलेच्या घरातील वस्तू जप्त केल्याचा प्रकार घडला आहे.
सागर जिल्ह्यातील पूनाबाई आणि त्यांची सून घरी असताना MPEB चे कर्मचारी आणि पोलीस घरी आले. त्यावेळी पुनाबाई अंघोळ करत होत्या. मात्र हे कर्मचारी थेट घरात घुसले आणि त्यांनी घरातून दुचाकी, टेबल घेऊन जायला निघाले. त्यावेळी त्यांनी उद्धटपणे बोलून पूनाबाई आणि त्यांच्या सूनाचा अवमान केला.
यावेळी पोलीस आणि विद्युत कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पूनाबाई यांना साडी गुंडाळून बाहेर यावं लागलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी असभ्य वागणूक दिल्याचं पूनाबाई सांगतात.
किती रुपयांची आहे थकबाकी
रेखा अहिरवार नावाच्या महिलेच्या नावे विद्युत कनेक्शन आहे. या महिलेकडे १९ हजार ४७३ रुपयांची थकबाकी आहे. यासंदर्भात विद्युत विभागाने महिलेला नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये तुम्ही ७ दिवसांच्या आत वीजबिल भरले नाही तर तुमचं वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असं म्हटलं होतं. मात्र पोलिस आणि विद्युत कर्मचारी यांनी ज्या पद्धतीने वसुली करण्याचा प्रयत्न केला त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रदुमन सिंह तोमर यांनी प्रतिक्रिया देत विद्युत कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून वरिष्ठ कर्मचाऱ्यांनाही नोटीस देण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच मध्य प्रदेश मध्ये अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असं ऊर्जामंत्री म्हणाले.
सागर जिले की यह घटना मीडिया/सोशल मीडिया के माध्यम से मेरे संज्ञान में आते ही उक्त प्रकरण में दोषी विद्युत विभाग के कर्मचारियों को तत्काल प्रभाव से सस्पेंड कर दिया गया है। एवं सम्बंधित वरिष्ठ अधिकारियों को भी नोटिस दिया गया है।
— Pradhuman Singh Tomar (@PradhumanGwl) March 26, 2023
उक्त विषय पर मेरा वक्तव्य:- https://t.co/0YgY0sJmnv pic.twitter.com/kip1JlGyFW
मध्य प्रदेश
— काश/if Kakvi (@KashifKakvi) March 26, 2023
बिजली बिल नहीं चुकाने पर विभाग द्वारा सागर ज़िले की दलित महिला के घर से बाइक, चारपाई सहित छोटे सामान ज़ब्त किए जानें पर बवाल बढ़ता देख ऊर्जा मंत्री ने बयान जारी किया।
उन्होंने कहा:
- 4 लोगों को सस्पेंड कर आला अधिकारी को नोटिस दिया।
- सरकार ऐसी कार्यवाही के खिलाफ़। pic.twitter.com/aOxBi7Xh1f